'माझा फंडा एकदम सोपा आहे. माझं काम आवडलं तर मला काम द्या. मला कुठल्याही गोष्टीचा फायदा घ्यायचा नाही. आजपर्यंत मी जे काम केलं त्याचा मला अभिमान आहे. कारण हे सगळं काम मी स्वतःच्या हिंमतीवर मिळवलं आहे', हे म्हणणं आहे अभिनेत्री इशा गुप्ताचं. आत्मविश्वासानं ती हे सांगते. अलीकडेच बोल्ड फोटोशूटमुळे ती चर्चेत आली होती. बॉलिवूडमधल्या घराणेशाहीविरोधातही तिनं तिचं बिनधास्त मत व्यक्त केलं होतं. त्यावर टीका झाल्यामुळे तिनं टीकाकारांना या शब्दांत उत्तर दिलंय.
काम मिळवलं हिंमतीवर
बॉलिवूडमधल्या घराणेशाहीविरोधातही तिनं तिचं बिनधास्त मत व्यक्त केलं होतं. त्यावर टीका झाल्यामुळे तिनं टीकाकारांना या शब्दांत उत्तर दिलंय.
Maharashtra Times 7 Sep 2017, 12:13 am