'काहे दिया परदेस' मालिकेतला शिव तुम्हाला आठवतोय का? तोच तो, ऋषी सक्सेना. त्या मालिकेनंतर तो फारसा कुठे दिसला नाही. लवकरच प्रदर्शित होणाऱ्या एका ऐतिहासिक चित्रपटात तो दिसणार असल्याचं समजतंय. त्याच्या भूमिकेबद्दल फारसं समजलं नाही. पण, या चित्रपटात तो महत्त्वपूर्ण भूमिकेत असल्याची चर्चा आहे. मालिकेनंतर त्यानं एक वेब सीरिज केली होती. पण, मालिकेनंतर तो सिनेमातून खऱ्या अर्थानं प्रेक्षकांसमोर येतोय.
ऐतिहासिक चित्रपटात
'काहे दिया परदेस' मालिकेतला शिव तुम्हाला आठवतोय का? तोच तो, ऋषी सक्सेना त्या मालिकेनंतर तो फारसा कुठे दिसला नाही...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 28 Oct 2019, 4:00 am