'पद्मावत' चित्रपटानंतर दीपिका पदुकोण कोणता चित्रपट करणार याची उत्सुकता तिच्या चाहत्यांमध्ये आहे. मग तिच्या चाहत्यांसाठी ही बातमी आहे. दीपिका आता दिग्दर्शक मेघना गुलजार यांच्या नवीन चित्रपटामध्ये दिसणार असल्याचं समजतंय. याआधी मेघनानं 'राझी'सारखा उत्तम चित्रपट प्रेक्षकांना दिला आहे. आता पुढच्या चित्रपटासाठी ती मुख्य भूमिकेसाठी अभिनेत्रीच्या शोधात आहे. आणि ते नाव बहुतेक दीपिकाचं असू शकतं अशी चर्चा सध्या बीटाऊनमध्ये रंगली आहे. 'पद्मावत'नंतर तिनं एकही सिनेमा स्वीकारलेला नाही. त्यामुळे तिचा नवा सिनेमा हाच असेल अशी चर्चा आहे.
मेघनाच्या सिनेमात?
'पद्मावत' चित्रपटानंतर दीपिका पदुकोण कोणता चित्रपट करणार याची उत्सुकता तिच्या चाहत्यांमध्ये आहे मग तिच्या चाहत्यांसाठी ही बातमी आहे...
Maharashtra Times 21 Sep 2018, 4:00 am