जॅकी चॅनच्या आगामी इंडो-चायनीजची सध्या खूप चर्चा आहे. निमित्त आहे फराह खानद्वारा केल्या जाणाऱ्या एका गाण्याच्या कोरिओग्राफीचं. या आंतरराष्ट्रीय प्रोजेक्टमध्ये महत्त्वाची भूमिका साकारणाऱ्या सोनू सूदनं हे सगळं जमवून आणलंय. त्यानंच फराहसह जॅकीला हे गाणं चित्रपटात टाकण्यासाठी राजी केलं म्हणे. विशेष म्हणजे जॅकीला तुम्ही पडद्यावर फायटिंग करताना पाहिलंय. पण यात त्याच्या आवाजात गाणंही ऐकायला मिळेल. खुद्द जॅकी हे गाणं हिंदी आणि इंग्रजीत गाणार आहे. हिंदी गाण्यात अमायरा दस्तूर आणि दिशा पटनी या अभिनेत्रींसह इतर १५० डान्सर्स आहेत म्हणे. राजस्थान आणि बीजिंगमध्ये या खास गाण्यांचं शूटिंग होत असल्याचं समजतं.
देसी तडका
जॅकी चॅनच्या आगामी इंडो-चायनीजची सध्या खूप चर्चा आहे. निमित्त आहे फराह खानद्वारा केल्या जाणाऱ्या एका गाण्याच्या कोरिओग्राफीचं.
Maharashtra Times 26 Mar 2016, 3:20 am