मुंबई मेरी जान
मुंबई ही मायानगरी खरी. या मेट्रोसिटीनं अनेकांचं करिअर घडवलंय. या कर्मभूमीबद्दल कृतज्ञता म्हणून प्रत्येकाला काही ना काही करायचं असतं. गायक जावेद अलीलाही मुंबईसाठी काहीतरी खास करायचं होतं.
Maharashtra Times 30 Jul 2016, 12:56 am
मुंबई ही मायानगरी खरी. या मेट्रोसिटीनं अनेकांचं करिअर घडवलंय. या कर्मभूमीबद्दल कृतज्ञता म्हणून प्रत्येकाला काही ना काही करायचं असतं. गायक जावेद अलीलाही मुंबईसाठी काहीतरी खास करायचं होतं. खूप दिवसांपासून हा विचार त्याच्या डोक्यात फिरत होता. 'आय अॅम नॉट स्लॅमडॉग आय अॅम इंडियन' या मराठी चित्रपटातल्या 'मुंबईसाठी मुंबईसाठी' या गाण्यातून त्याची ही इच्छा पूर्ण झालीय. मुंबई शहराचं गुणगान गाणारं हे गाणं आहे. जावेदनं यातून 'स्वच्छ मुंबई, सुंदर मुंबई'चा नारा देत मुंबईकरांना स्वच्छता राखण्याचं आवाहन केलंय.