अ‍ॅपशहर

तिथे कंगनाच योग्य

बॉलिवूडमधील फॅशनिस्टा अशी सोनम कपूरची ओळख आहे. सतत वेगवेगळ्या लूक्समध्ये दिसण्यासाठी ती प्रसिद्ध आहे. शॉपिंग हा तिचा वीक पॉइंट. तरुण मुली सोनमला स्टाइल आयकॉन मानतात. अशावेळी 'कन्फेशन्स ऑफ अ शॉपोहोलिक' या हॉलिवूडपटाचा हिंदी रिमेक बनला, तर मात्र चक्क ती बॉलिवूडची क्वीन कंगना रनोटचं नाव पुढे करते.

Maharashtra Times 13 Oct 2016, 12:55 am
बॉलिवूडमधील फॅशनिस्टा अशी सोनम कपूरची ओळख आहे. सतत वेगवेगळ्या लूक्समध्ये दिसण्यासाठी ती प्रसिद्ध आहे. शॉपिंग हा तिचा वीक पॉइंट. तरुण मुली सोनमला स्टाइल आयकॉन मानतात. अशावेळी 'कन्फेशन्स ऑफ अ शॉपोहोलिक' या हॉलिवूडपटाचा हिंदी रिमेक बनला, तर मात्र चक्क ती बॉलिवूडची क्वीन कंगना रनोटचं नाव पुढे करते. त्याचं झालं असं, की 'नो फिल्टर नेहा' या ऑडियो चॅटशो दरम्यान सोनमला हा प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा तिनं लगेच, 'खरं तर मलाच अशा चित्रपटात काम करायला आवडेल. पण कंगना या भूमिकेसाठी जास्त योग्य आहे' असं सांगून ती मोकळी झाली. थोडक्यात काय, तर सोनमलाही कंगनाचा हटके फॅशन सेन्स आवडतो. हाच या दोघींमधला समान दुवा आहे हे यातून सिद्ध होतं.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज