करीना कपूर बॉलिवूडची सुपरस्टार, मग कपडे तर तिच्याकडे खोऱ्यानं असणार. पण करीनानं तिच्याकडे असलेले जुने कपडेही जपून ठेवले आहेत म्हणे. म्हणजे ती वीस-एकवीस वर्षांची असतानाच्या जीन्स तिच्याकडे आहेत. एका फॅशन शोमध्ये तिनं हे गुपित सांगितलं. 'मला गोष्टी जपून ठेवायला आवडतात. मला नाही वाटत की माझ्या फिगरमध्ये फारसा बदल होईल. आवडते आणि शोभेल असे कपडे घातले की आपण स्टायलिश दिसतोच', असंही तिनं यावेळी सांगितलं.
करीनाने अजूनही जपून ठेवले आहेत जुने कपडे
करीना कपूर बॉलिवूडची सुपरस्टार, मग कपडे तर तिच्याकडे खोऱ्यानं असणार. पण करीनानं तिच्याकडे असलेले जुने कपडेही जपून ठेवले आहेत म्हणे.
Maharashtra Times 7 Feb 2018, 3:03 pm