आलिया भट आणि रणबीर कपूर यांच्यातल्या 'मधुर' नात्याची चर्चा सध्या खूप होतेय. आलिया तिच्या 'कलंक'चं शूटिंग कारगिलमध्ये करत होती. चित्रपटाचं शूटिंग संपलं आणि तिनं थेट अमेरिका गाठली. तुम्ही जर 'असं का?' हा प्रश्न विचाराल तर त्याचं उत्तर आहे, रणबीर. तो सध्या अमेरिकेत आहे. ऋषी कपूर सध्या उपचारांसाठी अमेरिकेत असल्यानं तो तिथे गेलाय. त्यामुळे आलियानंही अमेरिका गाठली. रणबीरनं काढलेला एक फोटोही तिनं सोशल मीडियावर पोस्ट केला होता.
कारगिल ते अमेरिका
आलिया भट आणि रणबीर कपूर यांच्यातल्या 'मधुर' नात्याची चर्चा सध्या खूप होतेय आलिया तिच्या 'कलंक'चं शूटिंग कारगिलमध्ये करत होती...
Maharashtra Times 17 Oct 2018, 4:00 am