सिनेमाच्या टिझरमध्ये एखादा मुख्य कलाकारच दिसला नाही तर तुम्हाला आश्चर्य वाटेल ना? मग 'भारत'चा टिझर पाहून प्रेक्षकांचं असंच झालं. या चित्रपटात सलमानसोबत कतरीना आहे. नुकताच प्रदर्शित झालेला त्याचा टिझर व्हायरल झाला खरा. प्रेक्षकांना त्याविषयी खूप उत्सुकता होती. पण तिचा सिनेमातला लुक पाहायला न मिळाल्याची चर्चा रंगली आहे. पण, तिचा लुक न दाखवण्यामागे खास कारण असून, तो आत्ताच दाखवला तर अर्धा चित्रपटच प्रेक्षकांना कळेल म्हणे. त्यामुळे पूर्ण टिझरभर सलमानच दिसतोय.
भारतच्या टिझरमधून कतरीना गायब
सिनेमाच्या टिझरमध्ये एखादा मुख्य कलाकारच दिसला नाही तर तुम्हाला आश्चर्य वाटेल ना? मग 'भारत'चा टिझर पाहून प्रेक्षकांचं असंच झालं...
महाराष्ट्र टाइम्स 28 Jan 2019, 8:33 am