‘पिंक’च्या यशानं अभिनेत्री कीर्ती कुल्हारीला इंडस्ट्रीत एक वेगळी ओळख मिळवून दिली आहे. मोठा पडद्यावर चमकल्यानंतर आता लवकरच ती एका वेबसीरिजमध्ये चमकणार आहे. 'लूझिंग माय व्हर्जिनीटी अँड अदर डम्ब आयडियाज' असं या वेबसीरिजचं नाव आहे. याच नावाच्या, माधुरी बॅनर्जी यांच्या बेस्टसेलिंग कादंबरीवर ही कलाकृती आधारित असल्याचं समजतं. या प्रोजेक्टमध्ये कीर्तीसोबत मॉडेल-होस्ट नताशा सुरी असेल. यानिमित्त दोन तरुणींचं प्रेम आणि सेक्सबद्दलचे भिन्न दृष्टिकोन इंटरनेटच्या माध्यमातून समोर येतील. केन घोष दिग्दर्शित या वेबसीरिजमध्ये आजच्या महिला, त्यांच्या इच्छा-आकांक्षा, त्यांना वाटणारी भीती या गोष्टी बघायला मिळतील. एप्रिल महिन्यात किर्तीची ही वेबसीरिज येणार असल्याचं समजतं.
कीर्ती झळकणार वेबसीरिजमध्ये
‘पिंक’च्या यशानं अभिनेत्री कीर्ती कुल्हारीला इंडस्ट्रीत एक वेगळी ओळख मिळवून दिली आहे. मोठा पडद्यावर चमकल्यानंतर आता लवकरच ती एका वेबसीरिजमध्ये चमकणार आहे. 'लूझिंग माय व्हर्जिनीटी अँड अदर डम्ब आयडियाज' असं या वेबसीरिजचं नाव आहे. याच नावाच्या, माधुरी बॅनर्जी यांच्या बेस्टसेलिंग कादंबरीवर ही कलाकृती आधारित असल्याचं समजतं.
Maharashtra Times 10 Feb 2017, 12:49 am