मृण्मयी देशपांडेचा 'फर्जंद' या आगामी सिनेमातला लूक सध्या चर्चेत आहे. यात तिनं हातात तलवार घेतली आहे. केवळ लुकसाठीच तिनं हातात तलवार घेतली नसून, भूमिकेची गरज म्हणून तिनं तलवारबाजीचं नीट प्रशिक्षण घेतलं आहे. कोंडाजी फर्जंदवर आधारित असलेल्या या चित्रपटामध्ये मृण्मयी स्वराज्यासाठी लढणाऱ्या छुप्या सैनिकाची भूमिका साकारतेय. शूटिंगच्या वेळी पंधरा दिवस दररोज चार तास ती तलवारबाजीचं प्रशिक्षण घेत होती.
मृण्मयी तलवारबाजी शिकली
मृण्मयी देशपांडेचा 'फर्जंद' या आगामी सिनेमातला लूक सध्या चर्चेत आहे. यात तिनं हातात तलवार घेतली आहे. केवळ लुकसाठीच तिनं हातात तलवार घेतली नसून, भूमिकेची गरज म्हणून तिनं तलवारबाजीचं नीट प्रशिक्षण घेतलं आहे.
Maharashtra Times 4 May 2018, 11:48 am