भूमिकेसाठी कलाकार अनेक गोष्टी शिकत असतात. 'इश्क'मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री अमायरा दस्तूर 'द ट्रिप २' या वेबसीरिजमध्ये झळकणार आहे. या वेबसीरिजसाठी ती बऱ्याच नवीन गोष्टी शिकतेय. त्यातलीच एक म्हणजे स्कूबा डायव्हिंग. या वेबसीरिजचं चित्रीकरण सध्या पाँडिचेरीमध्ये सुरू आहे. तिथल्याच खोल समुद्रात ती प्रशिक्षण घेतेय. स्कूबा डायव्हिंगचं प्रशिक्षण घेतल्यावर डायव्हिंगचा व्यावसायिक परवानाही ती घेणार आहे म्हणे.
स्कूबा शिकतेय
भूमिकेसाठी कलाकार अनेक गोष्टी शिकत असतात 'इश्क'मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री अमायरा दस्तूर 'द ट्रिप २' या वेबसीरिजमध्ये झळकणार आहे...
Maharashtra Times 17 Jul 2018, 4:00 am