लॉकडाऊनमुळे घरीच असल्यामुळे कलाकार सोशल मीडियावर खूप सक्रिय झाले आहेत. अनेक जण जुने फोटो अपलोड करत चाहत्यांशी त्या आठवणी शेअर करताहेत. अभिनेता अर्जुन कपूरनंही बहीण अंशुला कपूरबरोबरचा लहानपणीचा एक फोटो नुकताच पोस्ट केला आहे. त्याला काही मिनिटांतच खूप लाइक्स मिळाले. 'लहानपणापासूनच मी बहिणीबरोबर घरामध्ये लॉकडाऊन आहे' अशी गमतीदार ओळ त्यानं फोटोसोबत लिहिली आहे.
बहिणीबरोबर लॉकडाऊन
लॉकडाऊनमुळे घरीच असल्यामुळे कलाकार सोशल मीडियावर खूप सक्रिय झाले आहेत अनेक जण जुने फोटो अपलोड करत चाहत्यांशी त्या आठवणी शेअर करताहेत...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 1 Apr 2020, 4:00 am