कलर्स मराठीच्या 'सरस्वती' मालिकेत कान्हाची भूमिका साकारणारा अभिनेता माधव देवचक्के चांगलाच लोकप्रिय आहे. लवकरच एका नव्या भूमिकेत तो मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. महेश मांजरेकर दिग्दर्शित आगामी 'एफयु' सिनेमात त्याला ही संधी मिळाली आहे. यापूर्वी अनेक मराठी-हिंदी मालिकांमधून माधवने उत्तम व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. काही सिनेमांमध्येही तो झळकला होता. एफयुमध्ये माधवबरोबरच माधुरी देसाई, संस्कृती बालगुडे, आकाश ठोसर यांच्या महत्वाच्या भूमिका आहेत. सध्या या सिनेमाचं मुंबईत शूटिंग सुरु झालं आहे.
माधवचा नवा सिनेमा
कलर्स मराठीच्या 'सरस्वती' मालिकेत कान्हाची भूमिका साकारणारा अभिनेता माधव देवचक्के चांगलाच लोकप्रिय आहे. लवकरच एका नव्या भूमिकेत तो मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. महेश मांजरेकर दिग्दर्शित आगामी 'एफयु' सिनेमात त्याला ही संधी मिळाली आहे.
Maharashtra Times 7 Dec 2016, 12:00 am