सगळ्यांचा लाडका होस्ट मनीष पॉल सध्या एक गोष्ट खूप मिस करतोय. त्या काय, तर त्याचे रंगबिरंगी स्लिंग्स. गेल्या वर्षी खांद्यावर शस्त्रक्रिया झाल्यामुळे मनीषला त्या वापराव्या लागल्या होत्या. मात्र त्यातूनही या कॉमेडी स्टारनं स्वतःची स्टाइल स्टेटमेंट बनवली होती. 'झलक दिख ला जा'च्या सेटवर त्यानं हे मॅचिंग स्लिंग्स मस्त मिरवलेही. अर्थात शूटिंग करताना असा हात गळ्यात ठेवून वावरणं अवघड होतं. तेव्हाच्या वेदना, तो त्रास मी कधीच विसरू शकत नसल्याचं सांगतो. आता तो पूर्णपणे बरा झाला असून, जिमलाही जाऊ लागलाय. त्याचा 'बाबा ब्लॅक शिप' येत्या एप्रिल किंवा मेमध्ये प्रदर्शित होणार आहे. त्यानंतर मनीष लगेच सनी लिओनीबरोबर 'छुपा रुस्तम' सिनेमाचं शूटिंग सुरू करणार आहे.
ते मिस करतोय
सगळ्यांचा लाडका होस्ट मनीष पॉल सध्या एक गोष्ट खूप मिस करतोय. त्या काय, तर त्याचे रंगबिरंगी स्लिंग्स. गेल्या वर्षी खांद्यावर शस्त्रक्रिया झाल्यामुळे मनीषला त्या वापराव्या लागल्या होत्या.
Maharashtra Times 25 Jan 2017, 12:00 am