वेबसीरिजमुळे नावारूपाला आल्यानंतर कप साँग फेम मिथिला पालकरनं 'मुरंबा' या मराठी चित्रपटातून सिनेविश्वात झेप घेतली होती. आता ही सुंदरी लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. एका आघाडीच्या अभिनेत्यासोबत चित्रपटात काम करणार असल्याचं खुद्द मिथिलानं सोशल मीडियाद्वारे तिच्या चाहत्यांना सांगितलंय. या 'गर्ल इन द सिटी' फेम अभिनेत्रीला इरफान खान, डलकर सलमान अशा सुपरस्टार्ससोबत काम करण्याची संधी मिळणार असल्याचं सूत्रांकडून समजतंय. आकर्ष खुराणा दिग्दर्शित या सिनेमात मिथिला आणि डलकर प्रमुख भूमिकेत असतील.
बॉलिवूड झेप
वेबसीरिजमुळे नावारूपाला आल्यानंतर कप साँग फेम मिथिला पालकरनं 'मुरंबा' या मराठी चित्रपटातून सिनेविश्वात झेप घेतली होती. आता ही सुंदरी लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.
Maharashtra Times 16 Aug 2017, 12:58 am