आज प्रियांका चोपडाकडे ग्लोबल आयकॉन म्हणून बघण्यात येतं. ही देसी गर्ल अनेकांची प्रेरणा बनली आहे. मात्र अलीकडेच तिला प्रेरणा कुणाकडून मिळाली माहितेय? याचं उत्तर आहे ज्येष्ठ अभिनेत्री नीना गुप्ता. अलीकडेच राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या गुप्ता यांनी सध्या चांगल्या कामाच्या शोधात असल्याची पोस्ट टाकली. वयाच्या ६२वर्षी कायम असलेली त्यांच्यातली ऊर्जा बघून प्रियांकालाही प्रेरणा मिळाल्याचं तिनं कमेंट करून कळवलं.
प्रियंकाची प्रेरणा
आज प्रियांका चोपडाकडे ग्लोबल आयकॉन म्हणून बघण्यात येतं. ही देसी गर्ल अनेकांची प्रेरणा बनली आहे.
Maharashtra Times 31 Jul 2017, 12:19 pm