‘लागीरं झालं जी’ मालिकेत हाती तिरंगा घेऊन वीरमरण पत्करणाऱ्या विक्रमच्या व्यक्तिरेखेचं प्रेक्षकांनी कौतुक केलं. फौजी विक्रम उर्फ विक्या अर्थात, निखिल चव्हाण आता वेबसीरिजमध्ये चमकतोय. त्याच्या ‘स्त्रीलिंग पुल्लिंगी’ या वेबसीरिजची चर्चा सध्या रंगली असतानाच, त्याची आणखी एक वेबसीरिज लवकरच प्रेक्षकांसमोर येतेय. 'वीरगती' या सत्यकथेवर आधारित वेब फिल्ममधून निखिल एका लष्करी अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. राजू देसाई आणि विशाल देसाई दिग्दर्शित 'वीरगती' ही वेब फिल्म २६ जानेवारीला पाहता येईल.
'लागीरं...' फेम निखिल चव्हाण पुन्हा एकदा लष्करात
‘लागीरं झालं जी’ मालिकेत हाती तिरंगा घेऊन वीरमरण पत्करणाऱ्या विक्रमच्या व्यक्तिरेखेचं प्रेक्षकांनी कौतुक केलं. फौजी विक्रम उर्फ विक्या अर्थात, निखिल चव्हाण आता वेबसीरिजमध्ये चमकतोय.
महाराष्ट्र टाइम्स 23 Jan 2019, 9:56 am