जॉन अब्राहमनं आजवर अनेक देशभक्तीवर चित्रपटांमधून काम केलं आहे. आजच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त 'मुंटा'शी संवाद साधताना त्यानं देशप्रेम, देशाप्रती असलेली आपली कर्तव्यं या गोष्टींचा खास करून उल्लेख केला. तो म्हणतो, की 'स्वातंत्र्यदिन म्हणजे एक सुट्टीचा दिवस असं त्याकडे पाहिलं जातं. पण, आपल्याला मिळालेल्या स्वातंत्र्याचं हे सेलिब्रेशन आहे.
प्रत्येकानं या स्वातंत्र्याचं, आपल्या देशात असलेल्या लोकशाहीचं महत्त्व समजून घेतलं पाहिजे. आपल्याकडे चांगल्या-वाईट दोन्ही गोष्टी आहेत. देशातल्या महिलांबाबत प्रत्येक नागरिकानं आदर ठेवायला हवा.'
प्रत्येकानं या स्वातंत्र्याचं, आपल्या देशात असलेल्या लोकशाहीचं महत्त्व समजून घेतलं पाहिजे. आपल्याकडे चांगल्या-वाईट दोन्ही गोष्टी आहेत. देशातल्या महिलांबाबत प्रत्येक नागरिकानं आदर ठेवायला हवा.'