'ट्रॅप्ड' सिनेमाच्या सेटवर राजकुमार रावला जबर मार बसला. पण तरीसुद्धा या पठ्ठ्यानं शो मस्ट गो ऑन म्हणत शूटिंग पूर्ण केलं. या सिनेमातल्या एका दृश्यात घडलेला हा किस्सा आहे. या अभिनेत्याला त्याला एक जाड वस्तू खाली खेचायची होती. ते करत असताना त्याला खरोखरच मार बसला. यामुळे राजचा खांदा दुखावला. त्याला वेदना होत होत्या. पुढे दोन दिवस या पठ्ठ्याला वेदनाशामक गोळ्या घ्याव्या लागल्या होत्या म्हणे. पण तरीही त्यानं शूटिंग काही थांबवलं नाही.
शूटिंग थांबवलं नाही
'ट्रॅप्ड' सिनेमाच्या सेटवर राजकुमार रावला जबर मार बसला. पण तरीसुद्धा या पठ्ठ्यानं शो मस्ट गो ऑन म्हणत शूटिंग पूर्ण केलं. या सिनेमातल्या एका दृश्यात घडलेला हा किस्सा आहे. या अभिनेत्याला त्याला एक जाड वस्तू खाली खेचायची होती. ते करत असताना त्याला खरोखरच मार बसला.
Maharashtra Times 14 Mar 2017, 10:56 am