'ऑफिस ऑफिस'मधल्या मिसेस उषा आठवताहेत? येस, प्रेक्षकांच्या लाडक्या अभिनेत्री आसावरी जोशी आता पुन्हा एकदा हिंदी मालिकेत दिसणार आहेत. जवळपास दहा वर्षांहून अधिक काळानंतर हा योग जुळून आलाय. आगामी 'शंकर, जय किशन' या विनोदी मालिकेत त्या तिळ्यांच्या आईची भूमिका करताना दिसतील. मराठी मनोरंजनविश्वातली ही प्रसिद्ध अभिनेत्री यात चक्क पंजाबी भूमिका साकारेल.
योग जुळून आला
आगामी 'शंकर, जय किशन' या विनोदी मालिकेत त्या तिळ्यांच्या आईची भूमिका करताना दिसतील. मराठी मनोरंजनविश्वातली ही प्रसिद्ध अभिनेत्री यात चक्क पंजाबी भूमिका साकारेल.
Maharashtra Times 27 Jul 2017, 12:59 am