रणवीर सिंग आणि दीपिका पडुकोणच्या विवाहसोहळ्याची चर्चा आत्तापासूनच रंगू लागली आहे. लग्न म्हटलं की त्याची निमंत्रणं आली. आपल्या शुभमंगल सोहळ्याचं आमंत्रण देण्याची जबाबदारी स्वत: त्या दोघांनीच घेतली आहे. इंडस्ट्रीतल्या सर्व बड्या कलाकारांना आमंत्रण द्यायला ते स्वत: जोड्यानं जाणार आहेत. त्यांच्या विवाहाला बॉलिवूडचे झाडून सगळे कलाकार येतील असा अंदाज आहे. त्यामुळे आमंत्रणाची लगबग लवकरच सुरू होतेय असं म्हणायला हरकत नाही.
जोड्यानं आमंत्रण
रणवीर सिंग आणि दीपिका पडुकोणच्या विवाहसोहळ्याची चर्चा आत्तापासूनच रंगू लागली आहे लग्न म्हटलं की त्याची निमंत्रणं आली...
Maharashtra Times 10 Nov 2018, 4:00 am