'काला टीका'फेम पराग त्यागीच्या मते इंडस्ट्रीत हिट होण्यासाठी फिट असणं गरजेचं आहे. मालिकेतही बऱ्याचदा त्याचे शर्टलेस सीन्स असतात, ज्यासाठी तो खास काळजी घेतो म्हणे. 'शाळेत असल्यापासून व्यायाम आणि शरीरसौष्ठवाची मला आवड होती. त्यामुळे आजही मी सेटवर रोज माझं जिम किट घेऊन जातो' असं तो सांगतो. त्याच्या या किटमध्ये डंबेल्स, बारबेल्स यांसह डाएट प्रथिनं असलेले शेक्स असतात. तसंच आपल्या फिटनेससाठी म्हणून पराग दर चार तासांनी घरगुती जेवण-खाणंच घेत असतो.
फिटनेसची काळजी
'काला टीका'फेम पराग त्यागीच्या मते इंडस्ट्रीत हिट होण्यासाठी फिट असणं गरजेचं आहे. मालिकेतही बऱ्याचदा त्याचे शर्टलेस सीन्स असतात, ज्यासाठी तो खास काळजी घेतो म्हणे. 'शाळेत असल्यापासून व्यायाम आणि शरीरसौष्ठवाची मला आवड होती.
Maharashtra Times 22 Mar 2017, 9:06 am