बॉलिवूड स्टार्सनी राजकारणाच्या रिंगणात उतरणं नवीन नाही. करीना कपूरनं येत्या निवडणुकीला उभं राहावं अशी इच्छा नुकतीच एका पक्षानं व्यक्त केली. ही बातमी तिच्यापर्यंत पोहोचताच 'राजकारण नको रे बाबा' असं सांगून ती मोकळी झाली. 'सिनेमात अभिनय करणं हीच माझी आवड होती आणि इथून पुढेही तीच राहील', असं तिनं स्पष्ट केलं. आत्ता तरी ती 'नाही' म्हणतेय, पण पुढे काय होईल ते सांगता यायचं नाही.
करीना म्हणते, राजकारण? नको रे बाबा!
बॉलिवूड स्टार्सनी राजकारणाच्या रिंगणात उतरणं नवीन नाही करीना कपूरनं येत्या निवडणुकीला उभं राहावं अशी इच्छा नुकतीच एका पक्षानं व्यक्त केली...
Maharashtra Times 23 Jan 2019, 8:45 am