'मोहेंजोदारो'मधल्या चांगल्या अभिनयामुळे सिनेइंडस्ट्रीनं मॉडेल पूजा हेगडेची दखल घेतली. हा प्रोजेक्ट तिच्यासाठी फार महत्त्वाचा आहे. हा चित्रपट प्रदर्शित झाल्याशिवाय हातात नवीन काम घेणार नाही असं तिनं जाहीरपणे सांगितलं होतं. आता चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर पूजा काय करतेय याकडे इंडस्ट्रीतल्या सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे. ती स्वतः मात्र एकदम शांत आहे. बॉलिवूडमध्ये नुकत्याच दाखल झालेल्या अभिनेत्रींपेक्षा मी उजवी आहे असा आत्मविश्वास तिला आहे. 'प्रत्येक लूकमध्ये मी वेगळी दिसत असल्यानं मला ओळखणं अवघड आहे. आणि अभिनयाच्या दृष्टीनं हा खूप मोठा प्लस पॉईंट आहे. म्हणूनच इतर सगळ्यांपेक्षा मी स्वतःला बेस्ट समजते' असं पूजा सांगते.
म्हणूनच मी बेस्ट!
बॉलिवूडमध्ये नुकत्याच दाखल झालेल्या अभिनेत्रींपेक्षा मी उजवी आहे असा आत्मविश्वास तिला आहे. 'प्रत्येक लूकमध्ये मी वेगळी दिसत असल्यानं मला ओळखणं अवघड आहे. आणि अभिनयाच्या दृष्टीनं हा खूप मोठा प्लस पॉईंट आहे. म्हणूनच इतर सगळ्यांपेक्षा मी स्वतःला बेस्ट समजते' असं पूजा सांगते.
Maharashtra Times 23 Aug 2016, 7:16 am