भूमिकेसाठी कलाकारानं वजन कमी करणं किंवा वाढवणं नवीन नाही. या कलाकारांमध्ये आता अभिनेता आदित्य रॉय-कपूरची भर पडली आहे. आदित्य हा तगडा हिरो म्हणून सर्वांना माहित आहे. आता हा पठ्ठ्या वजन कमी करण्याच्या मागे लागलाय. डाएट, जिम वगैरे करत तो बारीक होण्याचा प्रयत्न करतोय. त्याच्या आगामी चित्रपटासाठी तो हा सगळा खटाटोप करतोय म्हणे. नव्या रुपात पाहण्यासाठी त्याचे चाहतेही उत्सुक असतील.
भूमिकेसाठी ‘बारीक’ अभ्यास
भूमिकेसाठी कलाकारानं वजन कमी करणं किंवा वाढवणं नवीन नाही या कलाकारांमध्ये आता अभिनेता आदित्य रॉय-कपूरची भर पडली आहे...
Maharashtra Times 27 Sep 2018, 4:00 am