अ‍ॅपशहर

इंडोनेशियात लोकप्रिय

मुंबई टाइम्स टीम आपल्याकडचे काही चित्रपट इतर देशांमध्येही धो-धो चालतात गेल्या चार-पाच वर्षांत हे प्रमाण खूप वाढलं आहे...

Maharashtra Times 17 Nov 2018, 4:00 am

मुंबई टाइम्स टीम

आपल्याकडचे काही चित्रपट इतर देशांमध्येही धो-धो चालतात. गेल्या चार-पाच वर्षांत हे प्रमाण खूप वाढलं आहे. आता हिंदी मालिकाही सिनेमांच्या पावलावर पाऊल ठेवू लागल्या आहेत. 'जाना ना दिल से दूर' ही हिंदी मालिका गेल्या वर्षी संपली. आता ती डब करून इंडोनेशियामध्ये दाखवली जातेय. तिथे या मालिकेला जोरदार प्रतिसाद मिळतोय. मराठी प्रेक्षकांसाठी खास बात म्हणजे अभिनेत्री शिवानी सुर्वे या मालिकेत मुख्य भूमिकेमध्ये चमकतेय. शिवानीला थेट इंडोनेशियामधून त्यांच्या चाहत्यांचे मेसेज येऊ लागले आहेत. अर्थात, त्यांच्या भाषा तिला कळत नसल्यामुळे हे मेसेज समजून घेण्याचा ती प्रयत्न करतेय. इंडोनेशियन चाहत्यांकडून मिळणाऱ्या प्रतिक्रियांबद्दल ती म्हणते की, 'मला माझ्या मेहनतीचं फळ मिळालंय हे मी नक्की सांगू शकते. आपल्या देशातही या मालिकेला चाहत्यांनी खूप प्रेम दिलं. तसंच प्रेम आता थेट इंडोनेशियामधून मिळतंय. या गोष्टीचा मला खूप आनंद झाला आहे. मला इंडोनेशियाला येण्याचं आमंत्रण तिथल्या लोकांनी दिलं आहे. त्यामुळे लवकरच इंडोनेशियामध्ये तिथल्या चाहत्यांना भेटायला मी जाणार आहे.'

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज