'जलेबी: द एव्हरलास्टिंग टेस्ट ऑफ लव्ह' या सिनेमाचं पोस्टर नुकतंच लाँच करण्यात आलं. दिग्दर्शक महेश भट यांनी ते सोशल मीडियावर शेअर केलं. या पोस्टरमध्ये हिरॉइन ट्रेनच्या खिडकीतून वाकून हिरोचं चुंबन घेताना दिसतेय. काही चाहत्यांना ते आवडलं असलं, तरी काहींनी, पोस्टरची ही कल्पना चोरलेली असल्याचं सांगत अशा प्रकारची आणखी काही पोस्टर्स पोस्ट केली. एका चाहत्यानं तर, 'हे बॉलिवूडवाले एक पोस्टरही स्वत: बनवू शकत नाही', असं सांगत त्याची खिल्ली उडवली.
पोस्टरची ढापाढापी?
द एव्हरलास्टिंग टेस्ट ऑफ लव्ह' या सिनेमाचं पोस्टर नुकतंच लाँच करण्यात आलं दिग्दर्शक महेश भट यांनी ते सोशल मीडियावर शेअर केलं...
Maharashtra Times 5 Sep 2018, 4:00 am