प्रसाद ओक सध्या नाटक, सिनेमांमध्ये बिझी आहेच. पण त्याचबरोबर तो दिग्दर्शनही करतोय. त्याचा ‘कच्चा लिंबू’ हा सिनेमा आता तयार आहे. तो येण्यापूर्वीच प्रसादने नव्या सिनेमाला हात घातलाय. या सिनेमाचं नाव आहे ‘हिरकणी’. शिवाजी महाराजांच्या काळातल्या त्याच हिरकणीवर तो सिनेमा बनवतोय. या महिला दिनी या सिनेमाची घोषणा होईल. या सिनेमाची कथा, पटकथा, संवाद चिन्मय मांडलेकरचे असून, ज्योतिबा फुले यांच्यावरील मालिकेनंतर चिन्मय-प्रसाद पुन्हा एकदा एकत्र येणार आहेत.
नवी हिरकणी
या महिला दिनी या सिनेमाची घोषणा होईल. या सिनेमाची कथा, पटकथा, संवाद चिन्मय मांडलेकरचे असून, ज्योतिबा फुले यांच्यावरील मालिकेनंतर चिन्मय-प्रसाद पुन्हा एकदा एकत्र येणार आहेत.
Maharashtra Times 8 Mar 2017, 12:11 am