अभिनेत्री प्रिया बापट सध्या तिच्या आगामी सिनेमाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. पण असं असतानाही तिने तिच्या कुटुंबाला प्राधान्य दिलं आहे. नुकतीच ती तिच्या कुटुंबाबरोबर एका आंतरराष्ट्रीय दौऱ्यावर गेली असल्याचं समजतं. प्रियाचं लग्न झाल्यानंतर ती पहिल्यांदाच तिच्या आई-वडिलांबरोबर परदेशात फिरायला गेली आहे. सोबत उमेश कामत आणि प्रियाची बहीण श्वेताही आहे. प्रियाच्या आई-वडिलांचा हा पहिलाच आंतरराष्ट्रीय दौरा असल्याचं तिने सोशल मीडियावर पोस्ट केलं आहे. 'माझ्या लग्नानंतर कुटुंबियांबरोबरची ही पहिलीच ट्रिप आहे. त्यामुळे मी खूप आनंदी आहे' असंही तिने पोस्टमध्ये म्हटलं आहे.
प्रिया टूरवर
प्रियाचं लग्न झाल्यानंतर ती पहिल्यांदाच तिच्या आई-वडिलांबरोबर परदेशात फिरायला गेली आहे. सोबत उमेश कामत आणि प्रियाची बहीण श्वेताही आहे. प्रियाच्या आई-वडिलांचा हा पहिलाच आंतरराष्ट्रीय दौरा असल्याचं तिने सोशल मीडियावर पोस्ट केलं आहे. 'माझ्या लग्नानंतर कुटुंबियांबरोबरची ही पहिलीच ट्रिप आहे. त्यामुळे मी खूप आनंदी आहे' असंही तिने पोस्टमध्ये म्हटलं आहे.
Maharashtra Times 7 Oct 2016, 12:12 am