आर.माधवन अलिकडे पुन्हा एकदा चर्चेत अालाय. दक्षिणेत झालेल्या एका सर्वेक्षणात सर्वात हॉट नायक म्हणून त्याची निवड झाली. यावर बोलताना वयाच्या ४७ व्या वर्षीही आपल्याला कुणी हॉट म्हणणं फारच गंमतीदार आहे असं तो सांगतो. इतकंच नव्हे, साला खडूसनंतर एका इरुधी सत्रु या तामीळ सिनेमात त्याने बॉक्सर-कोचची भूमिका साकारली होती. त्यालाही सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचं बक्षीस मिळालं. एकिकडे त्याच्या फिटनेसवरुन मिळालेली दाद आणि दुसरीकडे अभिनेता म्हणून मिळालेली पावती असं दोन्ही दिमतीला आल्यामुळे माधवन सध्या भलताच खुश आहे.
माधवन ठरला सर्वोत्कृष्ट
एकिकडे त्याच्या फिटनेसवरुन मिळालेली दाद आणि दुसरीकडे अभिनेता म्हणून मिळालेली पावती असं दोन्ही दिमतीला आल्यामुळे माधवन सध्या भलताच खुश आहे.
Maharashtra Times 5 Apr 2017, 12:13 am