आमीर खान आणि सनी देओल यांची थिएटरवरची टक्कर जुनी आहे. ‘लगान’ आणि ‘गदर’ हे दोन्ही सिनेमे एकाच दिवशी प्रदर्शित झाले आणि चर्चेला ऊत आला होता. त्यानंतर आमीर ख्रिसमसची सुटी पकडून आपला सिनेमा प्रदर्शित करत आला आहे. आता मात्र त्याने आपला ‘सिक्रेट सुपरस्टार’ हा सिनेमा दिवाळीत आणायचा ठरवलं आहे. यामुळे त्याच्यासमोर आव्हान असणार आहे ते रजनीकांतच्या ‘२.०’चं. शंकर दिग्दर्शित या सिनेमात अक्षयकुमारची भूमिका आहे. त्यामुळे आमीरने अत्यंत विचारपूर्वक हा निर्णय घेतल्याचं कळतं.
आमीर-रजनी आमनेसामने
यामुळे त्याच्यासमोर आव्हान असणार आहे ते रजनीकांतच्या ‘२.०’चं. शंकर दिग्दर्शित या सिनेमात अक्षयकुमारची भूमिका आहे. त्यामुळे आमीरने अत्यंत विचारपूर्वक हा निर्णय घेतल्याचं कळतं.
Maharashtra Times 12 Apr 2017, 12:19 am