‘शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला’ या नाटकाचा नाटककार म्हणून राजकुमार तांगडे पुढे आला. यात तो कामही करायचा. आता नाटकानंतर तो सिनेमाचं दिग्दर्शन करतोय. या सिनेमाचं लेखनही त्यानंच केलंय. ‘चिवटी’ असं या सिनेमाचं नाव असून, यात ‘भीमनगर..’मधली काही मुलं आहेत. ऊस, साखर कारखाने आणि त्याभवती फिरणारं राजकारण असा या सिनेमाचा विषय असणार आहे. मिलिंद शिंदे, संभाजी तांगडे, अश्विनी भालेकर, गौरी कोंगे, गजेंद्र तांगडे, मधुकर बिडवे यांच्याही सिनेमा महत्त्वाच्या भूमिका आहेत. या सिनेमाचा मुहूर्त नुकताच बीडमध्ये झाला. पुढे जालना, महाबळेश्वर इथेही सिनेमाचं शूट होणार आहे.
राजकुमार करतोय दिग्दर्शन
‘शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला’ या नाटकाचा नाटककार म्हणून राजकुमार तांगडे पुढे आला. आता नाटकानंतर तो सिनेमाचं दिग्दर्शन करतोय.
Maharashtra Times 25 May 2016, 12:59 am