सध्या ऑनलाइन विश्वात रणवीर सिंगच्या '...चिंग रिटर्न्स'नं धुमाकूळ घातलाय. अॅक्शन, कॉमेडी, रोमान्स असा तडका असलेला हा व्हिडिओ तरुणाईनं डोक्यावर घेतलाय. मसालापट बनवणाऱ्या रोहित शेट्टीनंच याचं दिग्दर्शन केलंय. या व्हिडिओच्या निमित्तानं रोहित-रणवीरची जोडी एकत्र आली आणि सोशल मीडियावर एकच कल्ला झाला. रोहितबरोबर काम करण्याची संधी मिळाल्यानं हा बाजीरावही एकदम खुशीत आहे. 'खूप आधीपासून मला रोहित सर आणि त्यांच्या टीमसोबत काम करायचं होतं. आमची सुरूवात अशी धमाकेदार होईल असं वाटलं नव्हतं. यापुढेही आम्ही असेच धमाके करू' असं तो उत्साहानं सांगतो.
धमाकेदार सुरूवात
सध्या ऑनलाइन विश्वात रणवीर सिंगच्या '...चिंग रिटर्न्स'नं धुमाकूळ घातलाय. अॅक्शन, कॉमेडी, रोमान्स असा तडका असलेला हा व्हिडिओ तरुणाईनं डोक्यावर घेतलाय. मसालापट बनवणाऱ्या रोहित शेट्टीनंच याचं दिग्दर्शन केलंय. या व्हिडिओच्या निमित्तानं रोहित-रणवीरची जोडी एकत्र आली आणि सोशल मीडियावर एकच कल्ला झाला.
Maharashtra Times 23 Aug 2016, 7:13 am