‘पद्मावती’सारख्या ऐतिहासिक सिनेमानंतर रणवीर सिंग आणखीन एक बड्या सिनेमाचं आव्हान पेलण्यासाठी सज्ज झालाय. कबीर खान दिग्दर्शित, क्रिकेट स्टार कपिल देव यांच्या जीवनपटात तो मुख्य भूमिकेत झळकणार असल्याचं समजतं. यानिमित्त १९८३ साली भारतानं विश्वचषक जिंकल्याचा तो जादूई क्षण मोठ्या पडद्यावर परत एकदा जिवंत होणार असल्यानं रणवीरचे चाहते खुशीत आहेत. भूमिकेची तयारी म्हणून रणवीरनं नेट प्रॅक्टिस करायला सुरुवात केलीय म्हणे.
कपिलच्या भूमिकेत
यानिमित्त १९८३ साली भारतानं विश्वचषक जिंकल्याचा तो जादूई क्षण मोठ्या पडद्यावर परत एकदा जिवंत होणार असल्यानं रणवीरचे चाहते खुशीत आहेत. भूमिकेची तयारी म्हणून रणवीरनं नेट प्रॅक्टिस करायला सुरुवात केलीय म्हणे.
Maharashtra Times 26 Sep 2017, 12:07 am