'गली बॉय' चित्रपटानंतर रणवीर सिंग '८३' या चित्रपटाच्या तयारीत व्यग्र आहे. १९८३ साली जिंकलेला विश्वचषक हा भारतीय क्रिकेटच्या इतिहासातला सुवर्णक्षण मानला जातो. त्यावर आधारित हा चित्रपट असून, रणवीर आणि चित्रपटाची संपूर्ण टीम त्यासाठी कसून तयारी करतेय. रणवीर कपिल देव यांची भूमिका साकारत असून, लवकरच तो दिल्लीला जाणार आहे. खुद्द कपिल यांच्याकडून तो दिल्लीमध्ये प्रशिक्षण घेणार आहे. जवळपास दहा दिवस कपिल देव त्याची शिकवणी घेतील.
कपिल घेणार रणवीरचा क्लास
'गली बॉय' चित्रपटानंतर रणवीर सिंग '८३' या चित्रपटाच्या तयारीत व्यग्र आहे. १९८३ साली जिंकलेला विश्वचषक हा भारतीय क्रिकेटच्या इतिहासातला सुवर्णक्षण मानला जातो. त्यावर आधारित हा चित्रपट असून, रणवीर आणि चित्रपटाची संपूर्ण टीम त्यासाठी कसून तयारी करतेय.
MT 9 May 2019, 9:31 am