काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झालेल्या 'केजीएफ' या चित्रपटाचा दुसरा भाग लवकरच येणार असल्याचं कळतंय. या चित्रपटाच्या निमित्तानं अभिनेत्री रवीना टंडनचं नाव चांगलंच चर्चेत आलंय. रवीना यामध्ये माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारणार असल्याचं बोललं जातंय. या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे. यापूर्वी अलीकडेच ती 'मातृ' या चित्रपटामध्ये दिसली होती. बऱ्याच दिवसांनंतर पुन्हा एकदा महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार असल्यानं तिचे चाहते त्यासाठी उत्सुक असतील.
रवीना टंडनचं इंदिरा गांधींच्या भूमिकेत
काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झालेल्या 'केजीएफ' या चित्रपटाचा दुसरा भाग लवकरच येणार असल्याचं कळतंय. या चित्रपटाच्या निमित्तानं अभिनेत्री रवीना टंडनचं नाव चांगलंच चर्चेत आलंय.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 30 May 2019, 9:03 am