'झेंडा', 'मोरया', 'कँडल मार्च', 'गोलमाल' यांसारख्या सिनेमांसाठी लेखन करणारे पटकथालेखक सचिन दरेकर नव्या इनिंगसाठी सज्ज आहेत. सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा ते सांभाळणार असल्याचं कळतंय. 'पार्टी' असं त्यांच्या या सिनेमाचं नाव आहे. मराठी सिनेसृष्टीतले प्रसिद्ध चेहरे या 'पार्टी'त असणार आहेत. पण, त्यांची नाव अद्याप गुलदस्त्यात आहेत. 'पार्टी' या नावामध्येच धमाल, मस्ती असल्यामुळे, मैत्रीतली गंमत दाखवणारा हा सिनेमा असेल असं बोललं जातंय.
‘पार्टी’साठी तयार
'झेंडा', 'मोरया', 'कँडल मार्च', 'गोलमाल' यांसारख्या सिनेमांसाठी लेखन करणारे पटकथालेखक सचिन दरेकर नव्या इनिंगसाठी सज्ज आहेत...
Maharashtra Times 26 Jun 2018, 10:52 am