आगामी 'मर्द को दर्द नही होता' या सिनेमाचा नायक गुलशन देवैय्या मुष्टीयुद्ध, अर्थात बॉक्सिंगच्या प्रेमात पडला आहे. सिनेमातल्या भूमिकेच्या तयारीसाठी गुलशननं बॉक्सिंग आणि मिक्समार्शल आर्टचं प्रशिक्षण घेतलं होतं. सिनेमा पूर्ण झाल्यानंतरही त्यानं आपलं प्रशिक्षण थांबवलेलं नाही. स्वतःची आवड म्हणून तो आता बॉक्सिंगचं पुढचं प्रशिक्षण घेत आहे. सिनेमाच्या नावाप्रमाणे गुलशनची भूमिका 'रफटफ' असून यापुढेही तसंच राहायचं त्यानं ठरवलंय म्हणे.
गुलशन देवैय्या बॉक्सिंगच्या प्रेमात
आगामी 'मर्द को दर्द नही होता' या सिनेमाचा नायक गुलशन देवैय्या मुष्टीयुद्ध, अर्थात बॉक्सिंगच्या प्रेमात पडला आहे...
महाराष्ट्र टाइम्स 25 Jan 2019, 8:51 am