अ‍ॅपशहर

सैफचा नकार

करण जोहरच्या आगामी ‘ए दिल है मुश्किल’ या सिनेमासाठी सैफ अली खानकडे विचारणा करण्यात आली होती. परंतु सैफने त्याला नकार दिला आहे. 

Maharashtra Times 29 Sep 2016, 2:48 am
करण जोहरच्या आगामी ‘ए दिल है मुश्किल’ या सिनेमासाठी सैफ अली खानकडे विचारणा करण्यात आली होती. परंतु सैफने त्याला नकार दिला आहे. ही भूमिका तशी छोटीशीच होती म्हणे. म्हणजे, सिनेमात पाहुणा कलाकार म्हणून येशील का, असं करणने सैफला विचारलं. त्यासाठी तारखा कुठल्या द्यायच्या हे त्याने सैफवरच सोपवलं. पण याच काळात सैफ दुखापतींमुळे हैराण झाला होता. डॉक्टरांनी त्याला २ महिने विश्रांतीचा सल्ला दिला. त्यामुळे त्याने नकार दिल्याचं सांगितलं जातं. सैफ नाहीय म्हटल्यावर करणने शाहरुखला विचारणा केली. त्याने मात्र चटकन करणला होकार दिला आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज