छोट्या पडद्यावर चांगली छाप पाडल्यानंतर अभिनेत्री साक्षी तन्वर मोठ्या पडद्यावरही चमकू लागलीय. ‘कट्यार…’, ‘मोहल्ला अस्सी’ या सिनेमांतल्या तिच्या भूमिकांचं कौतुक झालं. त्यानंतर ती आगामी 'दंगल'मध्ये आमिर खानच्या बायकोच्या भूमिकेत दिसणार आहे. मिस्टर परफेक्शनिस्टही तिच्या कामावर खूश आहे. साक्षीला वन टेक अभिनेत्री मानत असल्याचं त्यानं अलीकडेच सांगितलं. इतकंच नाही तर त्यानेच या भूमिकेसाठी दिग्दर्शकाकडे साक्षीच्या नावाची शिफारस केली होती म्हणे. त्यामागेही एक कारण आहे. आमिरची आई घरी खूप हिंदी मालिका बघते. त्यामुळे टीव्हीवर साक्षीचं काम बघून या भूमिकेसाठी साक्षी योग्य असल्याचं त्याला वाटलं. साक्षीसारख्या उत्तम अभिनेत्रीसोबत काम करणं त्यालाही आवडत असल्याचं समजतं.
वन टेक अभिनेत्री
इतकंच नाही तर त्यानेच या भूमिकेसाठी दिग्दर्शकाकडे साक्षीच्या नावाची शिफारस केली होती म्हणे. त्यामागेही एक कारण आहे. आमिरची आई घरी खूप हिंदी मालिका बघते. त्यामुळे टीव्हीवर साक्षीचं काम बघून या भूमिकेसाठी साक्षी योग्य असल्याचं त्याला वाटलं. साक्षीसारख्या उत्तम अभिनेत्रीसोबत काम करणं त्यालाही आवडत असल्याचं समजतं.
Maharashtra Times 6 Jul 2016, 12:12 am