श्रीदेवीच्या ‘मॉम’ या सिनेमाचं पोस्टर नुकतंच लाँच झालं. या सिनेमात तिची मुलगीही आहे. हे पोस्टर लाँच करायला आला होता साक्षात सलमान खान. कुणाबद्दल फार बरं न बोलणाऱ्या सल्लूने यावेळी श्रीदेवीचं इतकं कौतुक केलं, की साक्षात श्रीदेवीलाही आपल्या योगदानाबद्दल प्रश्न पडावेत. ‘मी, आमीर, शाहरुख आम्ही मिळून दोनेकशे सिनेमांमध्ये काम केलं असेल. पण श्रीदेवी यांनी बालपणापासून आजवर ३०० सिनेमात कामं केली आहेत. ते पाहता आजच्या इंडस्ट्रीच्या त्याच खऱ्या लीजंड आहेत’ असे उद्गार सल्लूमियांनी काढले.
श्रीसारखी कुणीच नाही
पण श्रीदेवी यांनी बालपणापासून आजवर ३०० सिनेमात कामं केली आहेत. ते पाहता आजच्या इंडस्ट्रीच्या त्याच खऱ्या लीजंड आहेत’ असे उद्गार सल्लूमियांनी काढले.
Maharashtra Times 16 Mar 2017, 12:46 am