दिवाळीनिमित्त कॉमेडीची जीएसटी एक्सप्रेसच्या मंचावर अलीकडेच श्रेयस तळपदेनं हजेरी लावली. यावेळी कॉमेडीस्टार समीर चौघुलेनं एक खास आठवण शेअर केली. कॉलेजमध्ये असताना एका एकांकिका स्पर्धेत समीर आणि श्रेयस आमनेसामने होते. त्यात समीरला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा तर श्रेयसला यासाठी द्वितीय पुरस्कार मिळाला होता. या बातमीचं कात्रण अजूनही समीरनं जपून ठेवलं आहे. ही आठवण ऐकताना श्रेयसही कॉलेजच्या आठवणींत रमला. 'माझ्यासाठी तू तेव्हाही उत्तम अभिनेता होतास आणि अजूनही आहेस' असं श्रेयसनं म्हणताच समीर भारावून गेला.
…अन् समीर भारावला
या बातमीचं कात्रण अजूनही समीरनं जपून ठेवलं आहे. ही आठवण ऐकताना श्रेयसही कॉलेजच्या आठवणींत रमला. 'माझ्यासाठी तू तेव्हाही उत्तम अभिनेता होतास आणि अजूनही आहेस' असं श्रेयसनं म्हणताच समीर भारावून गेला.
Maharashtra Times 17 Oct 2017, 12:32 am