सानिया मिर्झा उत्तम टेनिसपटू आहे हे आपल्याला माहितच आहे. पण ती गाणंही चांगलं गाते हे तुम्हाला कदाचित माहित नसेल. नुकत्याच झालेल्या एफबीबी फेमिना मिस इंडिया स्पर्धेत याची झलक दिसली. स्पर्धेला परीक्षक म्हणून सानिया उपस्थित होती. तिथे स्पर्धकांचं परीक्षण करण्याचं काम तिनं चोख बजावलंच. पण यावेळी तिला एक गाणं म्हणण्याची विनंती निवेदक मनीष पॉलने केली. आधी तिनं नकार दिला. नंतर मात्र सानियाने गायला सुरुवात केली. 'आशिकी २'मधल्या ‘क्यूंकी तुम ही हो...’ या गाण्याच्या दोन ओळी ती गायली. तिच्या आवाजाला सगळ्यांनीच टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली.
गाण्यातून जिंकलं
नुकत्याच झालेल्या एफबीबी फेमिना मिस इंडिया स्पर्धेत याची झलक दिसली. स्पर्धेला परीक्षक म्हणून सानिया उपस्थित होती. तिथे स्पर्धकांचं परीक्षण करण्याचं काम तिनं चोख बजावलंच. पण यावेळी तिला एक गाणं म्हणण्याची विनंती निवेदक मनीष पॉलने केली. आधी तिनं नकार दिला. नंतर मात्र सानियाने गायला सुरुवात केली.
Maharashtra Times 13 Apr 2016, 12:40 am