बॉलिवूडचा 'खलनायक' संजय दत्त दमदार कमबॅकसाठी सज्ज झालाय. त्यातच मुक्ता आर्टस आणि संजय दत्त प्रोडक्शन्स मिळून खलनायक रिटर्नज बनवणार असल्याचं अलीकडेच जाहीर करण्यात आलंय. बल्लू बलराम वीस वर्षांनी तुरुंगातून बाहेर आल्यापासून या नवीन कथेला सुरुवात होणार असल्याचं समजतं. अर्थातच जेलमधून बाहेर येतानाच्या सीनपासून सुरूवात होणार असल्यानं संजू बाबाच्या खऱ्याखुऱ्या आयुष्याशी आत्तापासूनच त्याची तुलना व्हायला सुरूवात झाली आहे. या वर्षाअखेरीस शूटिंगला सुरूवात होणार असल्याचं सुभाष घई यांच्याकडून समजतं. सध्या तरी या नवीन सिक्वेलच्या कथेवर काम सुरू असून लवकरच इतर कलाकारांची नावं जाहीर केली जाणार आहेत.
पुन्हा ‘खलनायक’
बॉलिवूडचा 'खलनायक' संजय दत्त दमदार कमबॅकसाठी सज्ज झालाय. त्यातच मुक्ता आर्टस आणि संजय दत्त प्रोडक्शन्स मिळून खलनायक रिटर्नज बनवणार असल्याचं अलीकडेच जाहीर करण्यात आलंय. बल्लू बलराम वीस वर्षांनी तुरुंगातून बाहेर आल्यापासून या नवीन कथेला सुरुवात होणार असल्याचं समजतं.
Maharashtra Times 12 Jul 2016, 12:45 am