‘भाभीजी घर पर हैं’ या मालिकेतून घराघरांत पोहोचलेल्या सौम्या टंडनला अलीकडेच ६० हजार रुपयांचा फटका बसला. तुर्कीमध्ये ती फिरायला गेली असताना हा प्रकार घडला. इस्तंबूलमधल्या एका टॅक्सीचालकानं सौम्याच्या पाकिटातून पैसे घेऊन पोबारा केला म्हणे. त्यातच टॅक्सीप्रवासाची कुठलीही पावती तिच्याकडे नव्हती. त्यामुळे पोलीससुद्धा तिला काहीच मदत करू शकले नाहीत. त्यामुळे आता ती परदेशात जाणाऱ्या प्रत्येकाला, टॅक्सीप्रवास करताना पावती नक्की घ्या हे सांगत असते.
गंडा घातला
त्यामुळे पोलीससुद्धा तिला काहीच मदत करू शकले नाहीत. त्यामुळे आता ती परदेशात जाणाऱ्या प्रत्येकाला, टॅक्सीप्रवास करताना पावती नक्की घ्या हे सांगत असते.
Maharashtra Times 13 Jun 2017, 12:39 am