शाहिद कपूर आणि मीराच्या बेबीमूनच्या फोटोंची खूप चर्चा झाली. सप्टेंबरमध्ये बाळाचं आगमन झाल्यानंतर शाहिद ‘सातवे आसमान पर’ असेल. खुद्द शाहिदही बाळाच्या आगमनासाठी खूप उत्सुक आहे. तो आगामी सिनेमाविषयी, त्याच्या भूमिकेविषयी बोलू लागला तरी त्याची गाडी आपोआप बाळावर येतेच. 'माझं संपूर्ण विश्वच बदलेल. जबाबदारी वाढणार आहे. त्यासाठी मानसिक तयारी केली आहे. सध्या तरी मी आणि मीरा बाळासाठी नावं शोधतोय. ही खूप लांबलचक प्रक्रिया असून नावं शोधणं खूप अवघड काम आहे. अजून तरी मला किंवा मीराला चांगलं नाव सुचलेलं नाहीय. पण आमची शोध मोहीम सुरू आहेच' असं हा अभिनेता सांगतो.
नावं शोधतोय
शाहिद कपूर आणि मीराच्या बेबीमूनच्या फोटोंची खूप चर्चा झाली. सप्टेंबरमध्ये बाळाचं आगमन झाल्यानंतर शाहिद ‘सातवे आसमान पर’ असेल.
Maharashtra Times 2 Jun 2016, 2:05 pm