शाहिद कपूरचा आगामी ‘पद्मावती’ सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आणि अवघ्या काही मिनिटांतच तो सोशल मीडियावर ट्रेंड व्हायला लागला. चित्रपटानं प्रदर्शनापूर्वीच एका विक्रमाची नोंद केलीय म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. संजय लीला भन्साळीदिग्दर्शित या सिनेमाच्या ट्रेलरनं पहिल्या २४ तासांत १.५ कोटी व्ह्यूज मिळवले. युट्यूबवर आतापर्यंत ‘पद्मावती’चा ट्रेलर अडीच कोटी युजर्सनी पाहिला आहे. इतक्या कमी वेळेत सर्वाधिक व्ह्यूज मिळवणाऱ्या हिंदी चित्रपटाच्या ट्रेलरच्या यादीत शाहिदच्या या सिनेमानं बाजी मारलीय.
आधीच विक्रम
शाहिद कपूरचा आगामी ‘पद्मावती’ सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आणि अवघ्या काही मिनिटांतच तो सोशल मीडियावर ट्रेंड व्हायला लागला. चित्रपटानं प्रदर्शनापूर्वीच एका विक्रमाची नोंद केलीय म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही.
Maharashtra Times 14 Oct 2017, 12:54 am