आगामी ‘ट्यूबलाइट’ सिनेमात शाहरूखनं पाहुण्या कलाकाराची भूमिका केली आहे. ही भूमिका अतिशय महत्त्वाची होती, असं दिग्दर्शक कबीर खान म्हणतोय. ‘कथेत सुपरस्टारची गरज नसती तर मी शाहरूखसारख्या स्टारला कधीच घेतलं नसतं. आधी मलासुद्धा त्याचं कास्टिंग अनावश्यक वाटलं; पण सिनेमा पाहिल्यावर त्याची भूमिका किती महत्त्वाची आहे हे लोकांनाही समजेल,’, असं कबीर पुढे म्हणाला. मुळात सलमानच्या सिनेमात शाहरूखला घेण्याचा घाट कबीरनं का घातला आहे, हे सिनेमा प्रदर्शित झाल्यावरच कळेल.
शाहरुख कशासाठी?
आगामी ‘ट्यूबलाइट’ सिनेमात शाहरूखनं पाहुण्या कलाकाराची भूमिका केली आहे. ही भूमिका अतिशय महत्त्वाची होती, असं दिग्दर्शक कबीर खान म्हणतोय.
Maharashtra Times 16 May 2017, 4:10 am