लेडी किलर शाहरुख खान एका जाहिरातीचं शूट करत असताना योगायोगानं त्याची बाजीगरमधली हिरॉईन शिल्पा शेट्टी बाजूलाच शूट करत होती. यानिमित्त दोघांची मस्त भेट झाली. दोघांनी मिळून जुन्या आठवणींना उजळा दिल्याचं समजतं. शिल्पानं तिच्या आयुष्यातील या पहिल्या हिरोसोबतचा फोटोही शेअर केला. त्यात तिनं एसआरकेच्या प्रेमळ स्वभावाचं वर्णन केलं होतं. इतकं कौतुक झाल्यावर आपला बादशाह खान थोडी शांत बसणाऱ्यातला आहे. त्यानं ही उगाच मला 'लेडी किलर' म्हणत नाहीत असा त्याच्या स्टाईलमध्ये मिश्किल पद्धतीनं शिल्पाला प्रत्युत्तर दिलं. दोघांचं हे ट्विटर संभाषण चाहत्यांसाठी फारच मनोरंजक ठरलं एवढां मात्र नक्की!
लेडी किलर
लेडी किलर शाहरुख खान एका जाहिरातीचं शूट करत असताना योगायोगानं त्याची बाजीगरमधली हिरॉईन शिल्पा शेट्टी बाजूलाच शूट करत होती. यानिमित्त दोघांची मस्त भेट झाली. दोघांनी मिळून जुन्या आठवणींना उजळा दिल्याचं समजतं. शिल्पानं तिच्या आयुष्यातील या पहिल्या हिरोसोबतचा फोटोही शेअर केला.
Maharashtra Times 28 Jul 2016, 12:12 am